Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हैराण करणारे आहे न्यूड रेस्टॉरंटमध्ये एंट्रीचे नियम

हैराण करणारे आहे न्यूड रेस्टॉरंटमध्ये एंट्रीचे नियम
लंडननंतर आता जपानमध्येही न्‍यूड रेस्टॉरंट उघडणार आहे, पण टोकियो येथे बनणाऱ्या या रेस्टॉरंटची केवळ थीमच न्यूड नव्हे तर येथे प्रवेशासाठी काही नियमही असतील. येथे कपड्यांविना प्रवेश करावे लागणार आहे. येथे प्रवेशापासून तर जेवण्याचा मजाही कपड्यांविनाच घ्यावा लागेल. हे रेस्टॉरंट पुढील महिन्याच्या 29 जुलैला टोकियो येथे उघडणार आहे.
लठ्ठ लोकांना प्रवेश नाही: रेस्टॉरंटच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीप्रमाणे अधिक लठ्ठ लोकांना येथे प्रवेश वर्जित आहे. प्रवेश करण्यापूर्वी पाहुण्यांना आपलं वजन करावं लागणार असून ते एका लिमिटवर वजनी असल्यास त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. शरीरावर टॅटू असणार्‍या लोकांनाही प्रवेश नसणार.
 
वयाची अट आणि कागदाचे कपडे: या रेस्टॉरंटमध्ये वयाची अट ठेवण्यात येणार असून केवळ 18 ते 60 वयापर्यंतचे लोकंच येथे प्रवेश करू शकतील आणि त्यांना आपले कपडे जमा करवून रेस्टॉरंटद्वारे प्रदान केले जाणारे कागदाचे अंडर गारमेंट्स घालावे लागतील.
 
एवढा खर्च लागेल: पूर्ण पेमेंट अॅडवांसमध्ये ऑनलाईन बुकिंगद्वारे करावा लागणार असून येथे प्रवेशासाठी 80,000 येन (750 अमेरिकी डॉलर) खर्च करावे लागतील. डांस शो विना केवळ जेवण्यासाठी किमान 14,000 ते 28,000 येन खर्च करावे लागतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

असं कसं हे प्रेम? सासूने जावयाशी केलं लग्न...