Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'ट्विट' करण्यातही आशिया आघाडीवर

'ट्विट' करण्यातही आशिया आघाडीवर

वेबदुनिया

WD
आशिया खंडाने 'ट्विट पोस्ट' करण्यात आघाडी घेतली आहे. अमेरिकेतून सध्या सर्वाधिक 'ट्विट पोस्ट' केल्या जातात, मात्र गेल्या काही महिन्यांत अमेरिकेतून 'ट्विट्‍स पोस्ट' करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. तरी याच कालावधीत आशिया खंडामधून 'ट्विट्‍स पोस्ट' करण्याचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये आशिया खंडातील 'ट्विटर युझर'ची संख्याही वाढली आहे. जगभरातून केल्या जाणार्‍या एकूण 'ट्‍विट्‍स'मध्ये अमेरिकेचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 25 टक्के इतके आहे.

मात्र मार्च महिन्यात यात 330 टक्क्यांनी घट झाली आहे. दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर जपान आणि इंडोशियाचा क्रमांक लागतो. 'ट्‍विट्‍स' करण्‍यामध्ये भारताने आशिया खंडात चौथे स्थान पटकावले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi