बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात आणखी दोन खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावरील एकूण खटल्यांची संख्या 94 वर पोहोचली आहे.
76 वर्षीय शेख हसीना यांनी गेल्या महिन्यात पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन भारतात गेल्या होत्या. अवामी लीगच्या नेत्या हसीना यांच्या विरोधात आतापर्यंत किमान 94 खटले दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी बहुतेक सरकारी नोकऱ्यांमधील वादग्रस्त कोटा प्रणालीच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या मोठ्या निषेधादरम्यान झालेल्या हत्येशी संबंधित आहेत.
19 जुलै रोजी निदर्शने करताना ढाका रहिवाशाच्या हत्येचा गुन्हा हसीना आणि इतर 26 जणांविरुद्ध बुधवारी नोंदवण्यात आला. मृताच्या पत्नीने ढाका मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट अफनान सुमी यांच्या कोर्टात केस दाखल केली, त्यांनी 'पोलिस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन'ला तपासानंतर अहवाल सादर करण्यास सांगितले.
हसीना, माजी कायदा मंत्री शफीक अहमद, माजी ऍटर्नी जनरल एएम अमीन उद्दीन, सर्वोच्च न्यायालयातील वकील तानिया आमीर आणि इतर 293 जणांविरुद्ध जत्राबारी भागातील एका विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत विद्यार्थ्याच्या आईने रविवारी जत्राबारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता