लंडन- जेवताना हवे तेवढेच पानात वाढून घेणे, पानातील सर्व जिन्नस खाऊन संपविणे आणि भुकेपेक्षा दोन घास कमी खाणे या जगभरातील सर्वच संस्कृतींमध्ये एकेकाळी चांगल्या सवयी मानल्या जायच्या. पण बदलेल्या जीवनशैलीत जगभरातील लोकांना उपबल्ध असलेले सुमारे 20 टक्के अन्न नको तेवढे खाण्याने किंवा पानात वाढून घेतलेले न खाता फेकून दिल्याने वाया जाते, असा निष्कर्ष एका अभ्यासातून काढण्यात आला आहे.