पाकव्याप्त काश्मीरमधून (पीओके) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पीओके तुरुंग अचानक फोडला आणि तुरुंगात कैद असलेले 20 दहशतवादी पळून गेले. दहशतवादी पळताना पाहून पोलिसांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला.
सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे
पीओकेच्या रावळकोटमधील जेल ब्रेकनंतर सर्व धोकादायक दहशतवादी एक एक करून पळून जाऊ लागले. तुरुंगातून पळून गेलेल्या दहशतवाद्यांचा व्हिडिओ कारागृहाबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दहशतवादी तुरुंगातून शांतपणे पळून जात असल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. मात्र दहशतवादी पळून जाण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना पकडण्याचे प्रयत्न केले. मात्र दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात एक दहशतवादी जागीच ठार झाला.
एकाकडे बंदूकही होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यापैकी एकाकडे बंदूकही होती. पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला.
शोध मोहीम सुरूच
हे प्रकरण पीओकेमधील रावळकोटचे आहे. पीओके पोलिसांनी तुरुंगातून पळून गेलेल्या दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. यासोबतच आजूबाजूच्या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 19 दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली आहे. मात्र अद्याप एकाही दहशतवाद्याच्या अटकेचे वृत्त नाही.