चीनची राजधानी बीजिंगमधील एका रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 21जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भीषण आगीचे दृश्य अतिशय भयावह होते. ज्वाला आणि धुराचे लोट दूरवर दिसत होते. आगीपासून वाचण्यासाठी काही लोक एसी वर उभे राहिले तर काहींनी उड्या मारायला सुरुवात केली. आत्तापर्यंत 71 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
बीजिंगमधील चांगफेंग रुग्णालयात ही घटना घडली. सध्या मात्र आगीचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
माहिती मिळताच पोहोचलेल्या अग्निशमन दलाला मोठ्या कष्टानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आग इतक्या वेगाने पसरली होती की तिने रुग्णालयाच्या पूर्वेकडील भागाला वेढले होते. या विभागामध्ये गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना दाखल करून उपचार केले जात होते. ही घटना दुपारी 12:57 च्या सुमारास घडली .
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओ आगीपासून वाचण्यासाठी काही लोक पत्र्याच्या साहाय्याने उड्या मारत असल्याचे दिसून येत आहे. तर तिथे काही लोक एसी वर बसलेले दिसले. एका यूजरने सोशल मीडियावर लिहिले की, हे दुःखदायक आहे. मी माझ्या घराच्या खिडकीतून अपघात पाहू शकतो. दुपारी वातानुकूलित युनिटवर अनेक लोक उभे होते आणि काहींनी जीव वाचवण्यासाठी खाली उड्याही मारल्या.