एक वाईट बातमी कोरियन मनोरंजन विश्वातूनसमोर आली आहे. पार्क बो राम प्रसिद्ध के-पॉप गायिका हिने 30 वर्षीच जगाचा निरोप घेतला आहे. ११ एप्रिल रोजी संध्याकाळी गायिका पार्क बो राम यांचे निधन झाले.तसेच ही बातमी कळताच शोककळा संगीत क्षेत्रात पसरली असून दुःख व्यक्त केले जात आहे.
या गायिकेच्या मृत्यूची बातमी एजन्सी XANADU एंटरटेनमेंटने दिली असून, एक निवेदन या एजन्सीने केले की, पार्क बो राम या गायिकेचे ११ एप्रिल रोजी संध्याकाळी आकस्मिक निधन झाले. तिच्या या मृत्यूने दक्षिण कोरियातील के-पॉप चाहते आणि संगीत उद्योग यांना धक्का बसला आहे. तसेच तिच्या मृत्यूचे कारण अजून समजले नाही.
तसेच “हे XANADU एंटरटेनमेंट असून, हृदयद्रावक बातम्या आणि दु:ख शेअर करण्यासाठी आम्ही आलो आहोत. 11 एप्रिल रोजी पार्क बो राम अचानक रात्री उशिरा निधन झाले. तसेच नामयांगजू पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी एक अहवाल दाखल केला असून त्यामध्ये दावा केला आहे की, एका खाजगी मेळाव्यात पार्क बो राम तिच्या मृत्यूच्या काही तास आधी होती. तसेच बाथरूमला जाण्याच्या निमित्ताने ती आत गेली पण परतलीच नाही. व नंतर तिच्या मैत्रिणींनी तिला सिंकवर बेशुद्ध अवस्थेत पहिले. त्यानंतर तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत गोष्टीत करण्यात आले. तसेच या महिन्याच्या सुरवातीलाच तिने तिचे आय मिस यु हे गाणे रिलीज केले होते.