Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IDF हल्ल्यात लेबनॉनमध्ये 356 लोक ठार

Lebanon
, मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 (08:30 IST)
इस्रायल आणि लेबनॉनमध्ये सातत्याने तणाव वाढत आहे. हिजबुल्लावर दबाव आणण्यासाठी इस्रायलने लेबनॉनमधील 300 लक्ष्यांवर हल्ले केले आहेत. हा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. इस्त्रायली हवाई हल्ल्यात 21 मुलांसह 356 जणांचा मृत्यू झाल्याचे लेबनीज अधिकाऱ्यांनी सांगितले. तर 1024 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 39 महिला आणि दोन डॉक्टरांचा समावेश आहे. सततच्या हल्ल्यांदरम्यान इस्रायलच्या मंत्रिमंडळाने विशेष दर्जा मंजूर केला आहे.

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इस्रायली हवाई हल्ले बिंट जबेल, अतारोन, मजदल सालेम, हौला, तोरा, कालालेह, हरिस, नबी चित, तरैया, श्मेस्टार, हरबता, लिब्बाया आणि सोहमोर यासह डझनभर शहरांवर झाले. 
 
रविवारी, हिजबुल्लाहने उत्तर इस्रायलमध्ये 100 हून अधिक रॉकेट डागले. इस्रायलच्या हैफा शहराजवळ रॉकेट पडले. या हल्ल्यात चार जण जखमी झाले. रॉकेट हल्ल्यानंतर हिजबुल्लाहचा उपनेता नईम कासिमने खुल्या युद्धाची घोषणा केली होती. प्रत्युत्तरादाखल, इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील हिजबुल्लाह लक्ष्यांवर हल्ला केला, त्यात एअरबेस आणि लष्करी उत्पादन सुविधांचा समावेश आहे.  
 
लेबनॉनमधून एका रात्रीत 150 हून अधिक रॉकेट, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले. यानंतर संतप्त झालेल्या इस्रायली सैन्याने पलटवार करत हिजबुल्लाचा टॉप कमांडर इब्राहिम अकीलला ठार केले.लेबनॉनमध्ये आतापर्यंत झालेल्या संघर्षात शेकडो लोक मारले गेले आहेत.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chess Olympiad : बुद्धिबळ चॅम्पियन्सने रोहित शर्माच्या शैलीत विजय साजरा केला