Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फिलीपिन्समध्ये लष्कराच्या विमानाला झालेल्या अपघातात 45 जण मृत्यूमुखी

फिलीपिन्समध्ये लष्कराच्या विमानाला झालेल्या अपघातात 45 जण मृत्यूमुखी
, सोमवार, 5 जुलै 2021 (09:45 IST)
दक्षिण फिलीपिन्समध्ये रविवारी (4 जुलै) लष्कराचं विमान कोसळलं. या विमानात 90 हून अधिक प्रवासी होते. यातील बहुतांश जण सैनिक होते. आतापर्यंत या दुर्घटनेत 45 जणांचा मृत्यू झाला, तर 5 जण अद्यापही बेपत्ता आहेत.
 
मृतांमध्ये बहुतांश सैनिकांचाच समावेश आहे, तर तीन सामान्य नागरिकही या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले आहेत. हे नागरिक विमानात नव्हते, तर विमान जिथे कोसळलं त्या ठिकाणी उपस्थित होते. फिलीपिन्सचे लष्करप्रमुख जनरल सिरिलिटो सोबेजाना यांनी या घटनेची माहिती दिली.
 
जनरल सिरिलिटो सोबेजाना यांनी AFP या वृत्तसेवा संस्थेला दिलेल्या माहितीनुसार, C-130 हे विमान सुलु प्रांताच्या जोलो बेटावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना कोसळलं. विमान कोसळल्यानंतर आग लागली. सोबेजाना यांनी सांगितलं की, बचावकार्यासाठी पथकं घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त विमानातील लोकांना वाचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
 
AFP च्या वृत्तानुसार, नुकतीच लष्करी प्रशिक्षणाची पदवी प्राप्त केलेले सैनिक या विमानात होते. मुस्लीमबहुल अशांत क्षेत्रात कट्टरतावाद्यांविरोधात लढण्यासाठी त्यांना तैनात केलं जाणार होतं. दक्षिण फिलीपिन्समध्ये अनेक कट्टरतावादी गट आहेत. त्यामुळे तिथं मोठ्या संख्येत सैनिक तैनात असतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोहन भागवत: 'सर्व भारतीयांचा डीएनए एकच, मग ते कोणत्याही धर्माचे असो'