Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तालिबान्यांकडून काबूल विमानतळावर गोळीबारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू

तालिबान्यांकडून काबूल विमानतळावर गोळीबारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू
, रविवार, 22 ऑगस्ट 2021 (14:37 IST)
काबूल आणि अफगाणिस्तानमध्ये सध्याची परिस्थिती पाहिली असता, अत्यंत भीषण आहे. तालिबान्यांच्या कचाट्यातून सुटण्यासाठी अनेक अफगाण नागरिक काबूल विमानतळावर उपस्थिती दर्शवत आहेत. परंतु आज (रविवार) तालिबान्यांकडून काबूल विमानतळावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला. त्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी अफगाण नागरिकांची धावाधाव सुरू होती. मात्र, गोळीबारामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता ब्रिटीश डिफेन्स मिनीस्टरकडून वर्तवण्यात येत आहे.
  
काबुलहून १६८ नागरिक भारतात दाखल ..
दिल्लीनजीकच्या गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर हे विमान उतरवण्यात आलं. या विमानातून 107 भारतीय नागरिकांसह एकूण 168 जण भारतात दाखल झाले. तत्पूर्वी, आजच ताजिकिस्तानहून 87 भारतीयांना घेऊन एअर इंडियाचं एक विमान नवी दिल्ली विमानतळावर पोहोचलं. यामध्ये दोन नेपाळी नागरिकांचाही समावेश होता. विमानतळाबाहेर पडण्याआधी या सर्व प्रवाशांना कोव्हिड चाचणी करून घ्यावी लागणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IPL 2021: बेंगळुरूच्या ताफ्यात हासारंगा, चमीरा; राजस्थानकडे बटलरऐवजी ग्लेन फिलीप