Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानमध्ये बसची वाहनाला धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू

पाकिस्तानमध्ये बसची वाहनाला धडक, अपघातात 9 जणांचा मृत्यू
, शनिवार, 11 जानेवारी 2025 (17:05 IST)
पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम खैबर पख्तुनख्वा प्रांतात शनिवारी बस आणि दुसऱ्या वाहनात भीषण टक्कर झाली. या धडकेत किमान 9 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तान पोलिसांनी ही माहिती दिली.
 
करक जिल्ह्यातील अंबरी काल्ले चौक येथे सिंधू महामार्गावर हा अपघात झाला, ज्यात एक वाहन आणि प्रवासी बसची धडक झाली, पोलिसांनी सांगितले. या अपघातात किमान नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, बसमध्ये एकूण किती प्रवासी होते याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जखमींच्या संख्येबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
 
पोलीस आणि बचाव अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांनी या अपघातात नऊ प्रवाशांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: महाराष्ट्र बोर्डाकडून इयत्ता 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे प्रवेशपत्र जारी