अनेक वेळा माकडांमुळे लोकांना समस्यांना सामोरे जावे लागते. ते लोकांच्या सामानाची चोरी तर करतातच पण लहान मुलांसाठी देखील धोकादायक असतात. माकडाला राग आला तर ते एखाद्याचा जीव देखील घेऊ शकतात. लहान मुलांना माकडांपासून वाचवून ठेवावे. अन्यथा ते लहान मुलांसाठी धोकादायक होऊ शकतात. असाच काहीसा प्रकार घडला आहे. एका तीन वर्षाच्या मुलीसोबत.आई वडील सोबत असताना एका माकडाने तीन वर्षाच्या चिमुकलीला पळवून नेल्याचा प्रकार घडला आहे.
हे प्रकरण चीनच्या दक्षिण -पश्चिम गुईझोऊ प्रांतातील आहे.मुलीचे आई-वडील शेतात काम करत असताना त्यांनी मुलीला एका झाडाच्या खाली झोपवले होते. एक माकड आला आणि त्याने मुलीला पळवून नेले. मुलीचा शोध घेतल्यावर देखील ती कुठेच सापडली नाही. लिऊ म्हणाले, 'मुलीची आई लगेच रडू लागली आणि मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि मी पोलिसांशी संपर्क साधला.' यानंतर हे लोक जवळच्या गावात गेले.त्यांना एक व्हिडिओ सापडला ज्यामध्ये एक जंगली माकड या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन जाताना दिसत आहे.
कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली आणि पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता मुलगी पोलिसांना सापडली. माकडाने मुलीला एका डोंगरावरून खाली फेकून दिले होते. ती एका कड्याच्या काठावर सापडली. ती झुडपात पडलेली दिसली. सुदैवाने तिला काहीही दुखापत झालेली नव्हती.
मुलगी सुखरूप असल्याने सर्वांचा जीवात जीव आला. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली असता ती पूर्णपणे स्वस्थ असल्याचे सांगितले. मुलीच्या शरीरावर किरकोळ जखमा झाल्या आहे.