मेक्सिकोमध्ये भीषण गोळीबार झाला आहे. गोळीबारात किमान १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मेक्सिकोच्या गुआनाजुआटोमध्ये एका उत्सवादरम्यान गोळीबार झाला. अज्ञात लोकांनी गोळीबार केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक जखमीही झाले आहेत. सेंट जॉन द बॅप्टिस्टच्या उत्सवात लोक रस्त्यावर नाचत आणि मजा करत असताना गोळीबार सुरू झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांनी गोळीबारावर दुःख व्यक्त केले आणि सांगितले की तपास सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik