Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डास चावल्यामुळे माणसावर 30 शस्त्रक्रिया झाल्या

डास चावल्यामुळे माणसावर 30 शस्त्रक्रिया झाल्या
, रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (17:10 IST)
डासांमुळे आजार होतो हे सर्वानाच माहित आहे. परनु एका डासामुळे माणसांवर शस्रक्रिया करण्याची वेळ येईल हे प्रथमच ऐकले आहे.डासांमुळे होणा-या सर्व आजारांबद्दल तुम्ही ऐकलेच असेल, पण इतका धोकादायक डास क्वचितच असेल, जो एखाद्या व्यक्तीवर 30 ऑपरेशन्स करण्याची वेळ आणून 4 आठवडे कोमात ठेवतो. जर्मनीतील रहिवासी असलेल्या सेबॅस्टियन रोत्शकेला आशियाई वाघांच्या प्रजातीने चावा घेतला आणि त्याच्यावर 30 वेळा शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. डासामुळे त्याचे प्राण संकटातच आले. 
 
रॉडरमार्कचा रहिवासी 27 वर्षीय सेबॅस्टियन रोत्शके (Sebastian Rotschke) याला एशियन टायगर प्रजातीचा डास चावला आणि त्याच्या रक्तात विष पसरले. रिपोर्टनुसार, त्यांना संसर्ग झाल्यानंतर त्यांचे यकृत, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांनी निकामी झाले. 2021 मध्ये, त्याला डास चावला आणि त्याच्या डाव्या मांडीवर त्वचा प्रत्यारोपण करावे लागले. सुरुवातीला त्याला फ्लूसारखी लक्षणे दिसू लागली आणि तो आजारी पडू लागला. तो खाऊ शकत नव्हता आणि अंथरुणातून उठू शकत नव्हता. आता जगणे अशक्य आहे असे त्यांना वाटले.
 
सेराटिया नावाच्या बॅक्टेरियाने त्याच्या डाव्या मांडीवर हल्ला केला आणि मांडीचा अर्धा भाग खाऊन टाकला. एशियन टायगर डास चावल्यामुळे ही सर्व लक्षणे दिसून येत असल्याचे डॉक्टरांना आतापर्यंत समजले होते. त्याच्यावर आता पर्यंत एकूण 30 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहे. त्यात त्यांच्या पायाची  दोन बोटे कापावी लागली. ते 4 आठवडे कोमात होते आणि डॉक्टरांनी सेबॅस्टिनला आयसीयूमध्ये ठेवून उपचार केले. आता ते सर्वांना सल्ला देतात की वेळेवर डॉक्टरकडे जाणे हा या धोकादायक संसर्गावर एकमेव उपचार आहे. डासाचा एक छोटासा चावा देखील तुमच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो.

Edited By - Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Kanpur Zoo Accident: कानपूर प्राणिसंग्रहालयातील अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू