भारताच्या शेजारी देश नेपाळमध्ये एक वेदनादायक रस्ता अपघाताची घटना समोर आली आहे. मध्य नेपाळमधील कावरेपाल्चोक जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी झालेल्या एका रस्ते अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला. कावरेपाल्चोकच्या एसपींनी याबाबत माहिती दिली आहे. या अपघातात 15 हून अधिक जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कावरेपाल्चोकच्या एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.30 च्या सुमारास घडली. ज्या बसला अपघात झाला त्या बसमध्ये धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन परतीच्या प्रवासाला लोक जात होते. जिल्हा पोलीस अधीक्षक चक्रराज जोशी यांनी सांगितले की, कावरेपालचौक येथील बेथानचौक ग्राम परिषद-4 येथील चालाल गणेशस्थान येथे धार्मिक कार्यक्रमातून घरी जाणाऱ्या लोकांच्या बसला अपघात झाला.
या अपघातात, तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 14 जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. याशिवाय 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. मात्र, या घटनेचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची कारणे शोधली जात आहेत. विशेष म्हणजे, राजधानी काठमांडूपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेथानचौक परिसरात खड्डेमय रस्ते आणि अरुंद उतार आहेत.
बेथानचौक ग्रामपरिषदेचे अध्यक्ष भगवान अधिकारी यांनी सांगितले की,बसचा संध्याकाळी 6 वाजता (स्थानिक वेळेनुसार) अपघात झाला. नेपाळ पोलीस आणि लष्कर बचावकार्य करत आहेत. शोध आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी जेसीबीचा वापर केला जात आहे. आरक्षित बसमध्ये किती प्रवासी होते हे अद्याप समजू शकलेले नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींवर शीर मेमोरियल हॉस्पिटल आणि धुलिखेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्या बसला अपघात झाला ती बस मौंजाच्या च्या धार्मिकसमारंभातून लोकांना घरी घेऊन जात होती, असे सांगण्यात येत आहे.