Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अफगाण सैन्याने हवाई हल्ले करून,30 हून अधिक तालिबानी दहशतवादींना ठार केले

अफगाण सैन्याने हवाई हल्ले करून,30 हून अधिक तालिबानी दहशतवादींना ठार केले
, रविवार, 25 जुलै 2021 (16:15 IST)
शुक्रवारी अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील कुर्नर येथे झालेल्या हल्ल्यात 21 तालिबानी दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर अफगाण हवाई दलाने आणखी दोन प्रांतांमध्ये हवाई हल्ले केले.या दोन हल्ल्यांमध्ये 30 हून अधिक तालिबानी अतिरेकी ठार झाले तर 17 जण जखमी झाले. शनिवारी देशाच्या संरक्षण मंत्रालयाने याची खातरजमा केली आहे.
 
एका वृत्तसंस्थेने अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तरेकडील जाझान प्रांताची प्रांतीय राजधानी शिबरघनच्या हद्दीत मुर्गब  आणि हसन तब्बीन या गावात युद्धक विमानांनी दहशतवादी ठिकाणावर कारवाई केली.या कारवाईत 19 दहशतवादी ठार आणि 15 जखमी झाले.
 
 
संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, दक्षिण हेलमंद प्रांताची राजधानी,लष्करगाहच्या बाहेरील भागात हवाई दलाच्या हल्ल्यात दोन गैर-अफगाण दहशतवाद्यांसह 14 तालिबानी ठार आणि दोन जखमी झाले. संपूर्ण कारवाईत तीन वाहने,सहा मोटारसायकली,दोन बंकर आणि शस्त्रे आणि दारूगोळा यांचा मोठा साठा नष्ट करण्यात आला. अमेरिकन आणि नाटो सैन्याच्या माघारानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या 419 जिल्ह्यांपैकी निम्मे जिल्हा ताब्यात घेतले आहेत.
 
बाइडन घनी यांना पाठिंबा देत आहेत, तसेच 10 कोटी डॉलर्सची मदत देतील
अफगाणिस्तानच्या अनेक भागात तालिबानचा ताबा असल्याने अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांना अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांनी आश्वासन दिले आहे. बाइडन यांनी अफगाणिस्तानात वाढत्या निर्वासितांचे संकट दूर करण्यासाठी आपत्कालीन मदत म्हणून10 कोटी डॉलर्सची मागणीही केली आहे. व्हाईट हाऊसने सांगितले की, बाइडन आणि घनी यांनी यासंदर्भात फोनवर संभाषण केले. तालिबानचा हल्ला शांतता कराराचे उल्लंघन असल्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले. बाइडन यांनी घनी यांना सांगितले की अमेरिका अफगाणिस्तानाशी राजनयिकरित्या जोडले आहेत 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लष्कराचे ऑपरेशन वर्षा;पूरग्रस्त भागातून नागरिकांना सुरक्षित स्थानी हलविले