अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पाकिस्तानचा तीव्र निषेध करत म्हटले आहे की, पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये दोन हवाई हल्ले केले, ज्यामध्ये आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तालिबानने हे देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात अनेक महिला आणि लहान मुलेही मारली गेली.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने सत्ता हाती घेतल्यापासून दोन्ही देशांमधील सीमा वादात सातत्याने वाढ होत आहे. सीमेवर दहशतवादी सतत हल्ले करत असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. दुपारी 3 च्या सुमारास पाकिस्तानच्या सीमेजवळील खोस्त आणि पक्तिका प्रांतातील घरांवर पाकिस्तानी विमानांनी बॉम्बफेक केली
पाकिस्तानच्या हद्दीत झालेल्या हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक मारले गेल्यानंतर शनिवारी हे हल्ले झाले, ज्यासाठी देशाचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी प्रत्युत्तर कारवाईचा इशारा दिला होता.