जगातील अव्वल तीन नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला आहे. Gallup International या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून हा दावा करण्यात आला आहे. आगामी दावोस परिषदेसाठी स्विर्त्झलंड दौऱ्यावर जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यामुळे छाप पडणार आहे.
जगातील ५० देशांतील नेत्यांचा यासाठी सर्वे करण्यात आला होता. यामध्ये जगातील तीन अव्वल नेते निवडण्यात आले. यामध्ये पहिल्या क्रमांकावर जर्मनच्या चांसलर अंजेला मार्केल, दुसऱ्या क्रमांकावर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्ष इमान्युएल मॅक्रोन तर तिसऱ्या स्थानी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा क्रमांक लागला आहे. चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमिर पुतिन, ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसा मे आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांना मागे टाकून मोदींनी हे स्थान राखले आहे.