Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 13 March 2025
webdunia

पाकिस्तानची सुरक्षा मदत थांबवली, अमेरिकेचा निर्णय

पाकिस्तानची सुरक्षा मदत थांबवली, अमेरिकेचा निर्णय
पाकिस्तानकडून दहशतवादी संघटनांविरोधात ठोस कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही पाकिस्तानला पुरवण्यात येणारी सुरक्षा मदत थांबविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हीथर नोर्ट यांनी दिली. 
 
त्यांनी म्हटले की, पाकिस्तान जोपर्यंत तालिबानी दहशतवादी संघटना, हक्कानी नेटवर्क यांसारख्या अशांतता पसरवणाऱ्या आणि अमेरिकन लोकांना इजा पोहोचवणाऱ्या घटकांविरोधात निर्णायक कारवाई करणार नाही, तोपर्यंत अमेरिका पाकला कोणतेही सुरक्षा सहाय्य पुरवणार नाही. या अंतर्गत ट्रम्प सरकार पाकिस्तानला देण्यात येणारी आर्थिक मदत थांबवू शकते. मात्र, रक्कम सरकारला अन्य ठिकाणी वळवता येणार नाही. जेणेकरून परिस्थिती सुधारल्यानंतर या निधीचा पुन्हा वापर करता येईल, असे हीथर नोर्ट यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जगातली सर्वात महागडी व्होडकाची बाटली चोरीला