Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आसिफ अली झरदारी दुसऱ्यांदा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले

asif ali zardari
, रविवार, 10 मार्च 2024 (10:28 IST)
आसिफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे14 वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. ते पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सह-अध्यक्षही आहेत. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले की त्यांना 255 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी अचकझाई यांना 119 मते मिळाली. दुसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडून आलेले झरदारी यांचा पहिला टर्म २००८ ते 2013 असा होता. झरदारी हे दोनदा राष्ट्रपती बनलेले देशातील पहिले व्यक्ती आहेत. आसिफ अली झरदारी हे सुन्नी इत्तेहाद परिषदेचे उमेदवार महमूद खान अचकझाई (वय 75) यांच्याशी स्पर्धा करत होते. 
 
झरदारी हे निवर्तमान डॉ. आरिफ अल्वी यांची जागा घेतील, ज्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला होता. तथापि, नवीन अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत ते या पदावर कायम आहेत. झरदारी एक व्यापारी-राजकारणी आणि पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पती आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांचे वडील आहेत. नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एनच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करणाऱ्या पाकिस्तान पीपल्स पार्टीचे झरदारी हे सह-अध्यक्ष आहेत. पीएमएल-एन आणि पीपीपी यांच्या युती करारानुसार शेहबाज शरीफ यांची पंतप्रधानपदी विराजमान झाली आहे.
 
 
दोन्ही पक्षांमधील करारानुसार पीएमएल-एनच्या मरियम नवाज यांची पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. तर सिंध प्रांतात पीपीपीला सत्ता मिळाली आहे. आसिफ अली यांचा विजय निश्चित मानला जात होता कारण केंद्रात तसेच पंजाब, सिंध, बलुचिस्तान विधानसभेत पीपीपी आणि पीएमएल-एन यांची युती बहुमतात आहे. तर विरोधकांकडे फक्त खैबर पख्तुनख्वा प्रांतात बहुमत आहे.
 
पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये 325 सदस्य आहेत. तसेच 91 सिनेटर आहेत. पंजाब विधानसभेत 354, सिंध विधानसभेत 157, खैबर पख्तूनख्वामध्ये 117 आणि बलुचिस्तान विधानसभेत 65 सदस्य आहेत. 
 
Edited By- Priya Dixit 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs ENG: धर्मशाला कसोटी जिंकून भारताने रचला इतिहास