Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्‍चनांच्या वाहनांवरील हल्ल्यात 24 ठार

इजिप्तमध्ये कॉप्टिक ख्रिश्‍चनांच्या वाहनांवरील हल्ल्यात 24 ठार
कैरो(इजिप्त) , शनिवार, 27 मे 2017 (09:50 IST)
आपल्या धार्मिक स्थळाकडे जाणाऱ्या कॉप्टिक ख्रिश्‍चनांच्या वाहनांवरील हल्ल्यात किमान जण 24 ठार आणि 27 जण जखमी झाल्याची माहिती इजिप्तच्या माध्यमांनी दिली आहे. मिन्या शहराजवळील वाळवंटातून जाणऱ्या कॉप्टिक ख्रिश्‍चनांच्या वाहनांवर अज्ञात बंदुकधाऱ्यांनी अंदांधुंद गोळीबार केला. हे हल्लेखोर लष्करी गणवेशात आले होते, असे हल्ल्यातून वाचलेल्यांनी सांगितले आहे. दक्षिण इजिप्तमध्ये कैरोपासून सुमारे 250 किमी अंतरावर झालेल्या या घटनेतील मृतांमध्ये मुलांचाही समावेश आहे. हल्लेखोरांनी बसमध्ये शिरून गोळीबार केला. हे सर्व कॉप्टिक ख्रिश्‍चन सॅम्युअल मॉनेस्ट्रीकडे जात होते.
 
या हल्ल्यात किमान 24 जण ठार आणि 27 जण झाल्याची माहिती इजिप्तच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते खालीद मेगाहेद यांनी दिली आहे. मात्र या हल्ल्याची जबाबदारी अद्यापपर्यंत कोणीही स्वीकारलेली नाही. हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम चालू असल्याची माहिती खालीद मेगाहेद यांनी दिली आहे. जखमींना हॉस्पिट्‌लमध्ये दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यात कॉप्टिक ख्रिश्‍चनांवर झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. 9 एप्रिल रोजी तांता आणि अलेक्‍झांड्रिया येथील चर्चवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात किमान 46 जण ठार झाले होते. इजिप्तमध्ये तीन महिन्यांसाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आलेली असून ती आणखी तीन महिने वाढविण्याचा पर्याय खुला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करणार : पीएम