सोशल मीडियावर आताच स्टार आहे हे बाळ. जन्माच्या अगोदरपासूनच या अकाउंटला 14 लाख फॉलोअर्स आहे. या बाळाच्या जन्माच्या चार दिवसांतच जवळपास 10 लाख लोकांनी याचे इंस्टाग्राम अकाउंट फॉलो केले आणि यामुळे एका रात्रीत हा मुलगा सोशल मीडियावर स्टार झाला.
या बाळाचे नाव आहे कॅलियन. आई जेसिका आणि वडील गॅरिटने आपल्या तिसर्या बाळाची आनंदाची बातमी शेअर केली असून इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला कॅलियनच्याच अकाउंटवरुन अपलोड करण्यात आले. या सहा दिवसाच्या बाळाचे इंस्टाग्रामवर अकाउंट आहे.
हे गोंडस बाळ कुणा श्रीमंत कुटुंबातील नाही तर यामध्ये आहे एक स्पेशल शक्ती. कॅलियनचा हा व्हिडिओ जसा त्याच्या आई- वडिलांनी शेअर केला अगदी त्याच्या काही वेळातच तो व्हायरल झाला. या कॅलियनच्या इंस्टा अकाउंटला अक्षरक्ष: लोकांनी पसंत केला आणि अनेकांनी या अकाउंटला फॉलो केले. कॅलियनचा जन्म अमेरिकेतील राज्य यूटामध्ये झाला.
इंस्टाग्रामवर बकेट लिस्ट फॅमिली अकाउंटवर जवळपास 10 लाख फॉलोअर्स आणि युट्यूबवर पावणे दोन लाख सबसक्रायबर आहेत. कॅलियनच्या जन्माच्या अगोदरपासून तो सेलिब्रिटी आहे. त्याच्या नावाने आई-वडिलांनी अकाउंट ओपन केले तेव्हाच त्याचे 5 लाख लोकं फॉलोअर्स होते. यामागील खास कारण म्हणजे कॅलियनचे वडील गॅरिटने 2014 मध्ये स्नॅपचॅटला बारकोड स्कॅनर आप जवळपास 3 अरब 50 करोड रुपयाला विकले. तसेच त्यांनतर त्यांनी सर्व प्रॉपर्टी आणि सामानदेखील विकले.
जेसिका आणि गॅरिट आपल्या दोन्ही मुलांना घेऊन वर्ल्ड टूरला घेऊन निघून गेला. 3 ते 4 वर्षात या कुटुंबाने जवळपास 50 देशांचा प्रवास केला आहे. आणि त्या अकाउंटच नाव बकेट लिस्ट फॅमिली असे ठेवण्यात आले आहे.