Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ओबामा यांनी घेतले नाताळ बाबाचे रूप, वाटल्या भरत वस्तू

ओबामा यांनी घेतले नाताळ बाबाचे रूप, वाटल्या भरत वस्तू
, सोमवार, 18 डिसेंबर 2017 (09:56 IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी याच नाताळबाबाचे रूप घेऊन अनेक लहान मुलांना भेटी देत त्यांना आश्चर्याचा धक्का दिला.  त्यांनी आपल्या याच अंदाजात वॉशिंग्टनमध्ये काही लहान मुला-मुलींना अनेक भेट वस्तू दिल्या. बराक ओबामा यांनी सांताक्लॉजसारखी लाल रंगाची टोपी डोक्यावर घातली होती. तसेच विविध प्रकारच्या भेटवस्तूंनी भरलेली पोतडीही ते त्यांच्या खांद्यावर घेऊन आले होते. वॉशिंग्टनमधील लहान मुलांसोबत त्यांनी अवघा अर्धा तास घालवला. पण या भेटीमुळे लहान मुले चांगलीच खूश झाली. बराक ओबामा सांताक्लॉज झाल्याचा व्हिडिओही ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Live Election Result : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल