मोठी बातमी ! H1B व्हिसावरील ट्रम्प यांचा नियम रद्द झाला
, रविवार, 19 सप्टेंबर 2021 (11:57 IST)
वॉशिंग्टन. अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वेतन-स्तरीय निवड प्रक्रियेद्वारे एच -1 बी व्हिसा निवडीसाठी सध्याची लॉटरी पद्धत बदलण्याचा प्रस्तावित नियम रद्द केला आहे. नियम रद्द केल्याने हजारो भारतीयांना फायदा होईल.
कॅलिफोर्नियाच्या नॉर्दर्न जिल्ह्यासाठी यूएस जिल्हाकोर्टाचे न्यायाधीश जेफ्री एस. व्हाईट यांनी ट्रम्प-युगातील एच -1 बी सीमा निवड नियमावली या कारणावरून फेटाळून लावली की ज्या वेळी हा नियम आणण्यात आला तेव्हा तत्कालीन कार्यवाहक होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी चॅड वुल्फ कायदेशीर सेवेत न्हवते .
H1B व्हिसा हा बिगर स्थलांतरित व्हिसा आहे ज्याच्या मदतीने अमेरिकन कंपन्यांसैद्धांतिक किंवा तांत्रिक कौशल्यतेची गरज असलेल्या परदेशी कामगारांना विशिष्ट व्यवसायात नियुक्त करण्यास परवानगी देतो भारत आणि चीनसारख्या देशांमधून दरवर्षी हजारो लोकांना कामावर घेण्यासाठी आयटी कंपन्या या व्हिसावर अवलंबून असतात
दरवर्षी जारी केलेल्या H-1 B व्हिसाची संख्या 65,000 पर्यंत मर्यादित असते,अतिरिक्त पदवी असलेल्या व्यक्तींसाठी अतिरिक्त 20,000 व्हिसा राखीव असतात. अर्जांची निवड करण्याची सध्याची प्रणाली प्रथम या,प्रथम मिळवा आणि लॉटरीवर आधारित आ
पुढील लेख