Publish Date: Mon, 30 Apr 2018 (16:53 IST)
Updated Date: Mon, 30 Apr 2018 (16:55 IST)
अफगाणिस्तानची राजधानी काबुल दुहेरी बॉम्बस्फोट झाला असून यात २३ जण ठार तर २७ हून अधिक नागरिक जखमी झाले आहे. मृतांमध्ये एका पत्रकाराचाही समावेश आहे. शशदारक क्षेत्रात एकापाठोपाठ हे स्फोट घडवण्यात आले आहेत. शशदारक येथील स्फोटातील जखमींना नागरिक मदत करत असतानाच दुसरा स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले आहे. बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्यापपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.गेल्या १५ दिवसात अफगाणिस्तानमध्ये ६ हल्ले झाले आहेत. आठवड्याभरापूर्वीच काबुलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ६० ठार तर १२९ नागरिक जखमी झाले होते.