Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्रिटेनच्या संसदेबाहेर गोळीबार, 12 जखमी

ब्रिटेनच्या संसदेबाहेर गोळीबार, 12 जखमी
लंडन , बुधवार, 22 मार्च 2017 (22:34 IST)
ब्रिटेनच्या संसदेबाहेर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात 12 जण जखमी झाले आहे. मंत्रालयाने सांगितले की पोलिसांनी हल्लाखोरांना ठार केले.  हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात एक महिला ठार झाली आहे. दरम्यान हा हल्ला दहशतवादी हल्लाच असल्याच्या वृत्तास पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनच्या संसदेबाहेरील वेस्टमिंस्टर ब्रिजवर एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला.  काही जणांना कारने चिरडण्यात आले. तसेच चाकूने भोकसण्याची घटनाही घडली.  यात 12 जण जखमी झाल्याचे समजते. तसेच, गोळीबार झाल्याचा मोठा आवाज आल्याची माहिती येथील काही नागरिकांनी दिली आहे. 
 
दरम्यान, गोळीबार झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संसदेचा परिसर बंद करण्यात आला.. तसेच, या ठिकाणी  हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हाऊस ऑफ कॉमन्सच्या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी ठार केले असून, संसदेतमध्ये बंदुकधारी पोलीस दाखल झाले आहेत. हल्लेखोराने एका पोलिसाला चाकू मारल्याचे समजते. त्याचबरोबर पंतप्रधान तेसेसा मे सुखरूप असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. या गोळीबारात जखमी झालेल्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
 
दरम्यान गोळीबार झाला तेव्हा संसदेमध्ये ब्रिटीश पंतप्रधानांसह 200 खासदार उपस्थित होते. या घटनेमुळे लंडनमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, ब्रिटनमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक चोख करण्यात आली आहे. हल्ल्यानंतर इमारतीला बंद करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लातूर, परभणी आणि चंद्रपूर या तीन महापालिकांचे निवडणुका