अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात गुरुवारी दोन छोटी विमाने हवेत धडकली. या अपघातात किमान दोन जणांचा मृत्यू झाला. ट्विन इंजिन असलेले सेसना 340 विमान विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना ही धडक झाली. स्थानिक विमानतळावर दोन विमाने उतरत असताना वॉटसनविले शहरात ही घटना घडली. स्थानिक अधिकार्यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे की या अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.
वॉटसनविले विमानतळाजवळ झालेल्या अपघाताची चौकशी सुरू झाली आहे. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. त्यावेळी दोन्ही खासगी छोटी विमाने विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात होती. फेडरल एव्हिएशन एजन्सी (FAA) च्या म्हणण्यानुसार यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड अपघाताची चौकशी करत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अपघाताची माहिती आणि व्हिडिओनुसार, विमानतळाच्या आजूबाजूच्या जमिनीत दोन छोट्या विमानांचा ढिगारा दिसत आहे. एका फोटोत विमानतळाजवळील रस्त्यावरून धुराचे लोट उठताना दिसत होते. विमानतळावर असलेल्या गोदामासारख्या बांधकामातही विमान शिरताना दिसले.