Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या अडचणी वाढल्या, जस्टिन ट्रुडो पदाचा राजीनामा देणार?

Justin Trudeau
, गुरूवार, 24 ऑक्टोबर 2024 (14:27 IST)
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तसेच जस्टिन ट्रुडो यांच्या पक्षातच त्यांच्यावर नाराजी पसरली आहे. त्यांच्या पक्षातील अनेक नेत्यांनी ट्रुडो यांच्याविरोधात आवाज उठवला असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार जस्टिन ट्रूडो यांच्या पक्षाच्या 24 खासदारांनी पत्रावर स्वाक्षरी केली आहे. तसेच पत्रात जस्टिन ट्रुडो यांच्याकडून राजीनामा मागितला आहे. सर्व खासदारांनी ट्रुडो यांना 28ऑक्टोबरपर्यंत वेळ दिला आहे. ट्रुडो यांच्या नेतृत्वावर ते खूश नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याचा फटका पक्षाला आगामी निवडणुकीतही सहन करावा लागू शकतो असे सांगण्यात येत आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2025 मध्ये कॅनडामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार असून त्यामुळेच ट्रुडो पुन्हा सत्तेत येण्यासाठी अनेक युक्त्या वापरत आहे. तसेच भारतावर खोटे आरोप करून दोन्ही देशांचे संबंध बिघडवण्यात ट्रुडो यांचा मोठा वाटा आहे. जस्टिन ट्रूडो यांनी कॅनडामध्ये उपस्थित असलेल्या भारतीय अनिवासी भारतीयांना आणि भारतीय वंशाच्या शीख व्होट बँकेला आवाहन करण्यासाठी अनेक वादग्रस्त विधाने केली आहे. इतकेच नाही तर कॅनडातील लोकही त्याच्या धोरणांवर खूप नाराज आहे. 
 
पण 3 तास चाललेल्या या बैठकीनंतर जस्टिन ट्रुडो बाहेर आले. तसेच ते म्हणाले की, लिबरल पक्षात सर्व काही ठीक आहे, पक्षाचे लोक एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून आमच्या पक्षाचे संपूर्ण लक्ष पुढील निवडणुकांवर आहे.
 
जस्टिन ट्रूडोचे मंत्री मार्क मिलर म्हणाले की, तिथे काय घडले हे सर्वांना माहीत आहे. खासदारांनी पंतप्रधान ट्रुडो यांना सत्यासमोर उभे केले आहे. आता ते ऐकायचे की नाही, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार, आगामी निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाला 39 टक्के, लिबरल पक्षाला 23 टक्के आणि न्यू डेमोक्रॅटिक पक्षाला 21 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. हा सर्व्हे समोर आल्यापासून ट्रुडो यांच्या लिबरल पक्षातील गदारोळ आणखी तीव्र झाला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे कसोटीतून केएल राहुल बाहेर, या माजी दिग्गजांनी व्यक्त केली वेदना !