अमेरिकेतील एका वृत्तपत्राला त्यांच्याच कार्यालयात झालेल्या हल्ल्याच्या वार्तांकनासाठी पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे.
कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राला हा पुरस्कार मिळाला आहे. मात्र हा पुरस्कार मिळाल्यानंतरही या कार्यालयात कोणत्याही प्रकारचा आनंदोत्सव साजरा केला नाही. तिथल्या कर्मचाऱ्यांनी या निमित्ताने फक्त मृत कर्मचाऱ्यांची आठवण काढली.
एका शस्त्रधारी व्यक्तीने जून 2018 मध्ये या कार्यालयावर हल्ला केला होता. न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉल स्ट्रीट जर्नलला सुद्धा यावर्षीचा पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे.
अमेरिकेच्या पत्रकारितेतल्या इतिहासातील हा एक अतिशय निर्घृण हल्ला होता. या हल्ल्याच्या वृत्तांकनाच्या वेळी वृत्तपत्राने जे धैर्य दाखवलं त्यासाठी त्यांना हा विशेष पुरस्कार देण्यात आला आहे.
मानपत्र आणि आणखी परिणामकारकरित्या पत्रकारिता करण्यासाठी 100000 डॉलर इतका निधी दिला आहे.
मागच्या वर्षी झालेल्या हल्ल्यात जॉन मॅकनमारा, वेंडी विंटर्स, रेबाका स्मिथ, गेराल्ड फिश्चमन, आणि रॉब हियासेन या कर्मचाऱ्यांचा समावेश होता. असं होऊनसुद्धा दुसऱ्या दिवशी नेहमीच्या वृत्तपत्राचा अंक प्रकाशित झाला होता.
हल्लेखोराचा या वृत्तपत्रावर बऱ्याच काळापासून रोष होता. त्या रागातूनच हा हल्ला केला होता. तरी त्याने हा हल्ला केल्याच्या आरोपाचा इन्कार केला होता.
सामूहिक हल्ल्याच्या बातम्यांसाठी आणखी दोन स्थानिक वृत्तपत्रांना पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे.
पिट्झबर्ग पोस्ट गॅझेट या वृत्तपत्रालाही ऑक्टोबर महिन्यात पेन्सेलव्हेनिया येथील प्रार्थनास्थळावर झालेल्या हल्लायाच्या संयमित आणि सखोल वार्तांकनासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. या हल्ल्यात 11 जणांचा बळी गेला होता.
तसंच दक्षिण फ्लोरिडातील सन सेंटिनेल या वृत्तपत्राला मर्जोरी स्टोनमेन डल्लास हायस्कुल या शाळेवर झालेल्या हल्ल्यात 17 जणांना जीव गमवावा लागला होता.
या हल्ला हाताळताना शाळा आणि कायदा सुव्यवस्था राखताना संस्थांना आलेलं अपयश दाखवणाऱ्या बातम्या दिल्याबदद्ल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी कर भरण्यात केलेली दिरंगाई या विषयावर केलेल्या वार्तांकनासाठी आणि आणखी एका संपादकीयासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
वॉल स्ट्रीट जर्नल लाही राष्ट्राध्यक्षांनी गुप्तपणे दिलेली लाच आणि तसंच त्यांच्या असलेल्या दोन बायका याविषयी वार्तांकन केल्याबद्दल पुरस्कार दिला गेला.
येमेनमधील परिस्थिती छायाचित्र आणि विश्लेषणाच्या माध्यमातून मांडल्याबदद्ल वॉशिंग्टन पोस्टला पुरस्कार दिला गेला.
तर म्यानमारमधील रोहिंग्या येथील रखाईन भागात 10 जणांच्या मृत्यू झाला होता. या विषयावर केलेल्या शोध पत्रकारितेसाठी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला पुल्तिझर पुरस्कार देण्यात आला.