Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून पसरतोय रोग

अमेरिकेत नव्या आजाराचा फैलाव, लाल आणि पिवळ्या कांद्यापासून पसरतोय रोग
, शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (16:11 IST)
कोरोनानंतर अमेरिकेच्या बर्‍याच राज्यात नवीन आजार फैलावत आहे. लाल आणि पिवळ्या कांद्यामुळे हा रोग पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या ३४ राज्यांतील ४०० हून अधिक लोक या आजारामुळे गंभीर आजारी पडले आहेत. अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) ने लोकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले असून कांदे खाण्याविषयी सावधगिरीचा इशारा दिला आहे.
 
लाल आणि पिवळ्या कांद्यापासून साल्मोनेला बॅक्टेरियाचा संसर्ग अमेरिकेच्या बर्‍याच राज्यांत पसरत आहे, ३४ राज्यात ४०० हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेच्या सर्वात मोठ्या आरोग्य एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी) ने याबाबत सतर्कता जारी करून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
 
कॅनडामध्ये साल्मोनेला बॅक्टेरियाच्या संसर्गाची घटना समोर आली आहेत. या बॅक्टेरियामुळे आतापर्यंत ६० लोक कॅनडामधील रुग्णालयात दाखल आहेत.
 
अमेरिकेच्या फूड अ‍ॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने सांगितले की, अमेरिकेच्या ३४ राज्यात पसरलेल्या साल्मोनेलाचा थेट लाल कांद्याशी थेट संबंध आहे. थॉमसन इंटरनॅशनल लाल, पांढरा, पिवळा आणि गोड कांदे परत मागवण्यात आले आहेत. या कंपनीने पुरवठा केलेला कांदा खाण्याची आवश्यकता नाही.
 
जेव्हा या बॅक्टेरियामुळे माणसं आजारी असता तेव्हा अतिसार, ताप आणि ओटीपोटात वेदना अशी लक्षणे दिसून येतात. त्याची लक्षणे ६ तास ते ६ दिवसांपर्यंत कधीही दिसू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गूगलचा चीनला दणका, चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली