Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

China: चीनमध्ये बालवाडीत चाकूने हल्ला; सहा जणांचा मृत्यू

crime
, सोमवार, 10 जुलै 2023 (21:53 IST)
चीनच्या आर्थिक शक्तीचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्वांगडोंग प्रांतातील एका नर्सरी स्कूलमध्ये (बालवाडी) चाकूने वार केल्याची घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून आणखी एक जण जखमी झाला आहे. प्रांतीय सरकारच्या प्रवक्त्याचा हवाला देऊन अहवालात म्हटले आहे की मृतांमध्ये एक शिक्षक, तीन महिला विद्यार्थी आणि एक पती-पत्नी यांचा समावेश आहे. 

सदर घटना सोमवारी सकाळी 7:40 वाजता घडली. नंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. वू असे आरोपीचे नाव असून त्याचे वय सुमारे २५ वर्षे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी जाणूनबुजून हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अलीकडच्या काळात देशाने चाकू हल्ल्याच्या घटना पाहिल्या आहेत. एवढेच नाही तर तेथील शाळांमध्येही अशा अनेक घटना घडल्या आहेत.
 



Edited by - Priya Dixit   
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Canada Open Badminton: लक्ष्य सेनने अंतिम फेरीत ऑल इंग्लंड चॅम्पियन ली शी फेंगचा पराभव करत कॅनडा ओपन जिंकली