Publish Date: Sat, 31 May 2025 (15:45 IST)
Updated Date: Sat, 31 May 2025 (15:48 IST)
भारताने पुन्हा एकदा आपली राजनैतिक शक्ती दाखवली. शशी थरूर यांच्या कडक शब्दांत सांगितल्यानंतर कोलंबियाला पाकिस्तानबद्दलची भूमिका बदलावी लागली. आणि भारताला दहशतवादावर थेट पाठिंबा मिळाला.
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली कोलंबियाला पोहोचलेल्या भारतीय बहुपक्षीय शिष्टमंडळाने मोठा राजनैतिक विजय मिळवला आहे. थरूर यांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याला कोलंबियाने दिलेल्या प्रतिसादावर नाराजी व्यक्त केली तेव्हा तेथील सरकारला निवेदन मागे घ्यावे लागले!
कोलंबियाच्या उपपरराष्ट्रमंत्री रोझा योलांडा म्हणाल्या की भारताकडून मिळालेल्या स्पष्ट माहितीनंतर आता दोन्ही देशांमध्ये रचनात्मक संवाद शक्य आहे."
थरूर म्हणाले की, २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचा हात असल्याचे भारताकडे ठोस पुरावे आहेत. २६ निष्पाप लोक मारले गेले आणि भारताने केवळ स्वसंरक्षणार्थ प्रतिसाद दिला."
भारताची दहशतवादावरील कठोर भूमिका जागतिक व्यासपीठांवर पोहोचवण्यासाठी हे शिष्टमंडळ ३३ देशांच्या दौऱ्यावर आहे. कोलंबियानंतर, हे शिष्टमंडळ ब्राझील आणि नंतर अमेरिकेला जाईल."
यामुळे येत्या काही दिवसांत शशी थरूर यांची राजनैतिकता पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी एकाकी पाडेल असे दिसून येत आहे. तसेच भारताची रणनीती आता अधिक देशांवर प्रभाव पाडेल. या राजनैतिक विजयाला मोठे यश म्हटले जाऊ शकते.