Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डोनाल्ड ट्रंप यांचं ट्विटरवर पुनरागमन, अकाऊंट पुन्हा सुरू

डोनाल्ड ट्रंप यांचं ट्विटरवर पुनरागमन, अकाऊंट पुन्हा सुरू
, रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (10:27 IST)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं ट्विटरवर पुनरागमन झालंय. जानेवारी 2021 पासून त्यांचं ट्विटर अकाऊंट निलंबित होतं.
 
उद्योगपती इलॉन मस्क यांच्याकडे ट्विटरची मालकी आल्यानंतर अनेक वेगवान घडामोडी घडत असतानाच, ट्रंप यांचं अकाऊंट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झालाय.
डोनाल्ड ट्रंप यांचं अकाऊंट पुन्हा सुरू करावं का, यासाठी इलॉन मस्क यांनी ट्विटरवर पोल घेतला होता. त्यात ट्रंप यांचं अकाऊंट सुरू करण्याच्या बाजूनं अधिक मतं पडली.
डोनाल्ड ट्रंप यांचं ट्विटर अकाऊंट जानेवारी 2021 मध्ये कायमच निलंबित करण्यात आलं होतं. हिंसेला प्रोत्साहन देण्याच्या शक्यतेमुळे ही कारवाई केल्याचे ट्विटरनं म्हटलं होतं.
 
ट्विटरने याबाबत सांगताना राष्ट्राध्यक्षा डोनाल्ड ट्रंप यांनी गेल्या काही दिवसात केलेल्या ट्वीट्सचा दाखला दिला होता.
 
ट्विटरनं म्हटलं होतं की, @realDonaldTrump अकाऊंटवरील ट्वीट्सच्या संदर्भांना पाहिलं गेलं आणि त्यानंतरच अकाऊंट कायमस्वरूपी निलंबित करण्यात आलं.

याआधीही ट्विटरने 12 तासांसाठी डोनाल्ड ट्रंप यांचं अकाऊंट बंद केलं होतं. तेव्हाच खरंतर ट्विटरकडून सांगण्यात आलं होतं की, ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन केल्यास ट्रंपना कायमचं निलंबित करण्यात येईल.
6 जानेवारी 2021 रोजी ट्रंप यांनी ट्वीट केले, त्यात त्यांनी कॅपिटोल हिल हिंसेतील समर्थकांना 'देशभक्त' म्हटलं होतं. या समर्थकांनी अमेरिकन काँग्रेसच्या इमारतीत अर्थात कॅपिटल इमारतीत घुसून तोडफोड आणि घोषणाबाजी केली होती.

त्यावेळी अमेरिकन काँग्रेसमध्ये नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या निवडीची औपचारिक घोषणेची प्रक्रिया सुरू होती.
 
समर्थकांच्या या हिंसेआधी ट्रंप यांनी भाषण केलं होतं आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "आपण हार मानायची नाही. आपण हे स्वीकारायचं नाही."
 
दुसरीकडे, गुरुवारी (7 जानेवारी) फेसबुकनेही डोनाल्ड ट्रंप यांचं अकाऊंट अनिश्चित काळासाठी निलंबित करण्याची घोषणा केली आहे.
 
त्याचसोबत, गेमिंग प्लॅटफॉर्म ट्विचने निलंबनाची कारावई केलीय. या प्लॅटफॉर्मवरून ट्रंप आपल्या भाषणांचं लाईव्ह प्रक्षेपण करत असत. आता ट्रंप यांच्याकडे स्नॅपचॅट उरलंय.
 
ट्विटरनं निलंबनाची कारवाई का केली होती?
डोनाल्ड ट्रंप हे ट्विटरचा खुबीनं वापर करायचे. लोकांना सांगावयाची असलेली गोष्ट ते तातडीने ट्वीट करायचे. थोडक्यात व्यक्त होण्याचं ट्विटरसारखं माध्यम त्यांना आवडत होतं. एका क्लिकवर कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता असलेलं माध्यम म्हणजे ट्विटर.
 
6 जानेवारीला कॅपिटोल इमारतीवर हल्ला झाल्याच्या 48 तासांतर ट्विटरनं ट्रंप यांचं अकाऊंट निलंबित केलं. अर्थात, ट्विटरसाठी काही हा सहजपणे घेण्याचा निर्णय नव्हता.

ट्रंप यांचं ट्विटरवर असणं हे ट्विटरच्या फायद्याचंच होतं. जगातील सर्वात ताकदवान व्यक्तीचे ताजे अपडेट ट्विटरवरून लोकांना कळत असत. मात्र, काही कारणांमुळे ट्विटरला ट्रंप यांचं अकाऊंट निलंबित करावं लागलं.
 
ट्विटरल येणाऱ्या काळात हिंसेला प्रोत्साहन देऊ शकतात, असं अंदाज वर्तवला जातोय. मात्र, ट्रंप हे आता सत्तेपासून दूर जातायेत, हेही एक कारण मानलं जातंय. आता ट्रंप सर्वसामान्य अमेरिकन नागरिकासारखे असतील.
Published By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवरायांनी औरंगजेबाकडे 5 वेळा माफी मागितली होती, भाजप नेताचे वादग्रस्त वक्तव्य