Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्रंप अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष

ट्रंप अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष
अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाचे 45 वे राष्ट्रपती म्हणून  शपथ घेतली आहे. तर  अमेरिकन परंपरेप्रमाणे बायबलवर हात ठेवत अमेरिकेच्या मुख्य न्यायाधीशांकडून ट्रम्प यांनी पद आणि गोपनीयतेची शपख घेतली. शपथविधी सोहळ्यात उपाध्यक्ष माइक पेन्स यांनाही पदाची शपथ देण्यात आली. यावेळी  मावळते अध्यक्ष बराक ओबामा, माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, बिल क्लिंटन आणि जिमी कार्टर यांच्यासह लाखो अमेरिकी नागरिक उपस्थित होते.डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन त्याचं अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिला.
 
ट्रंप यांच्या भाषणातील मुद्दे 
जगातील इस्लामिक दहशतवादा समूळ नष्ट करणार - डोनाल्ड ट्रम्प
वॉशिंग्टन - अमेरिकेला पुन्हा एकदा शक्तिशाली, महान बनवण्यासाठी प्रयत्न करण्यास प्राधान्य असेल 
वॉशिंग्टन : अमेरिका एक महान देश आहे आणि आजच्या दिवशी पुन्हा एकदा देशात लोकांचे राज्य आले आहे. लोक शासक बनले आहेत 
 वॉशिंग्टन : ही सत्ता माझी नाही नागरिकांची आहे. आपण सगळे मिळून देशाला बदलूया 
 डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिका फर्स्टचा नारा.
आम्ही वॉशिंग्टनमधून अमेरिकी नागरिकांना त्यांची शक्ती परत करत आहोत 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्कॉटलंड यार्डची मदत घेता येणार नाही