Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 16 March 2025
webdunia

डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा आदेश! ४१ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश बंदी

Donald Trump
, शनिवार, 15 मार्च 2025 (14:50 IST)
US News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सरकारच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहे आणि आता ते ४१ देशांवर नवीन प्रवास बंदी घालण्याची योजना आखत आहे.  
ALSO READ: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ३००० नवीन बस जोडल्या जाणार
मिळालेल्या माहितीनुसारट्रम्प लवकरच पाकिस्तानसह ४१ देशांवर व्हिसा बंदी घालण्याचा आदेश जारी करू शकतात, ज्याचा थेट परिणाम या देशांच्या नागरिकांवर होईल. तसेच नवीन प्रवास बंदी यादीनुसार, ट्रम्प यांनी आधीच १० देशांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अफगाणिस्तान, इराण, सीरिया, क्युबा आणि उत्तर कोरिया सारखे देश समाविष्ट आहे. या देशांच्या नागरिकांचे व्हिसा पूर्णपणे निलंबित केले जातील. याशिवाय, दुसऱ्या यादीत पाच देशांची नावे आहे, ज्यात इरिट्रिया, हैती, लाओस, म्यानमार आणि दक्षिण सुदान यांचा समावेश आहे. या देशांच्या नागरिकांचे व्हिसा अंशतः निलंबित केले जातील. याशी संबंधित व्हिसा श्रेणींमध्ये विद्यार्थी व्हिसा, पर्यटक व्हिसा आणि स्थलांतरित व्हिसा यांचा समावेश असू शकतो. ट्रम्प प्रशासनाने तिसऱ्या यादीत पाकिस्तान, भूतान आणि इतर २४ देशांचा समावेश केला आहे. या देशांच्या नागरिकांचे व्हिसा अंशतः निलंबित केले जातील आणि जर या देशांच्या सरकारने 60 दिवसांच्या आत व्हिसा प्रक्रियेत सुधारणा केली नाही तर व्हिसा पूर्णपणे निलंबित केले जातील. अशी माहिती समोर आली आहे.
ALSO READ: सुनीता विल्यम्स-बुच विल्मोर नऊ महिन्यांनंतर पृथ्वीवर परततील

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: विजय वडेट्टीवार यांनी ओवेसींच्या विधानावर हल्लाबोल केला