Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंगळ ग्रहावर आढळला दरवाजा, इथं खरंच परग्रहवासी राहतात का?

mangal
, शुक्रवार, 20 मे 2022 (21:07 IST)
nasa
अमेरिकेच्या नासा अंतराळ संस्थेकडून मंगळ ग्रहावर संशोधन करण्यासाठी एक 'क्युरोसिटी रोव्हर' पाठवलं होतं. पण या रोव्हरने पाठवलेल्या एका फोटोवरून जगभरात खळबळ माजली आहे.
 
या फोटोमध्ये मंगळावरील खडकाळ जमिनीवर एका दरवाजासारखा आकार स्पष्टपणे दिसू शकतो. या 'दरवाजा'च्या फोटोमुळेच गेल्या काही दिवसांत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
 
हा खरोखरंच एक दरवाजा आहे, असं काहींनी म्हटलं. परग्रहवासींनीच हा दरवाजा तयार केल्याचं मत काहींनी व्यक्त केलं आहे.
 
खरं तर हे रोव्हर 2012 पासून मंगळ ग्रहाविषयी माहिती पृथ्वीवर पाठवत आहे. नव्या फोटोंमुळे सर्व माहितीची व्याख्या पुन्हा नव्याने करणं आवश्यक असल्याचं म्हटलं जात आहे. नासाच्या मते, हे ज्याचं त्याचं दृष्टीकोन आहे.
 
दरवाजाची आकृती कशी बनली असावी?
नासाच्या क्युरोसिटी रोव्हरद्वारे मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाचा हा फोटो 7 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.
 
सोल 3466 सिरीजमधील हा फोटो असल्याचं नासाने म्हटलं होतं. याला मार्स एक्सप्लोरेशन प्रोग्रॅमच्या वेबसाईटवर अनेक फ्रेमसह प्रसिद्ध करण्यात आलं होतं.
 
पण दरवाजाचा हा आकार पाहताच इंटरनेटवर एकच खळबळ माजली. लोक या फोटोसंदर्भात अनेक कथा सांगू लागले.
 
पण हा फोटो या या सिरीजमधला एक छोटासा भाग आहे. संपूर्ण आकार पाहिल्यास फोटो पाहणाऱ्याचा दृष्टीकोन बदलू शकतो.
 
नासाने बीबीसी मुंडोशी बोलताना सांगितलं, "ही जागा म्हणजे जमिनीतील एक छोटासा खळगा किंवा फट आहे."
 
ही आकृती पूर्णपणे पाहण्यासाठी खालील फोटो नीट पाहा. या फोटोमध्ये दिसतं की दरवाजा म्हणून सांगितली जाणारी जागा ही अतिशय छोटी आहे.
 
नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी म्हणजेच JPL च्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, "ही फट आकाराने अतिशय छोटी म्हणजे 45 सेंटीमीटर लांब आणि 30 सेंटीमीटर रुंद आहे."
 
नासाच्या मते, या पूर्ण फोटोमध्ये अनेक फ्रॅक्चर (फट) आहेत. लांबून घेतलेल्या फोटोत हे पाहता येऊ शकतं.
 
उत्सुकता वाढवणारे फ्रॅक्चर
गेल्या काही दिवसांत अनेक या फ्रॅक्चरवर तज्ज्ञांचं लक्ष गेलं.
 
ब्रिटनच्या भू-शास्त्रज्ञ नील हॉजसन यांनी मंगळावरील भू-आकृतींचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या मते, "या फोटोंमुळे उत्सुकता वाढली आहे. पण त्या गूढ अशा बिलकुल नाहीत."
 
लाईव्ह सायन्स नामक वेबसाईटशी बोलताना त्यांनी म्हटलं, "थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ती एक निसर्गतः तयार झालेली खाच आहे. फोटोत अशा प्रकारच्या अनेक खाचा दिसू शकतील. त्यामध्ये माती किंवा वाळूचे अनेक थर आहेत."
 
हॉजसन यांनी सांगितलं, "जमीन बनत असताना सुमारे 400 कोटी वर्षांपूर्वी हे थर जमा होत गेले. नदी किंवा हवेच्या माध्यमातून टेकडी बनत गेली आणि जमीन तयार झाली. अशा प्रकारच्या पृष्ठभागावर हे खाचखळगे तयार होणं स्वाभाविक आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोण आहेत ऋषी सुनक? ब्रिटनच्या 'संडे टाईम्स रिच लिस्ट'मध्ये ज्यांना स्थान मिळाले आहे