Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्घाटना वेळी पूल कोसळला, 'नेताजी' पत्नीसह नाल्यात पडले, व्हिडीओ व्हायरल !

उद्घाटना वेळी पूल कोसळला, 'नेताजी' पत्नीसह नाल्यात पडले, व्हिडीओ व्हायरल !
, बुधवार, 8 जून 2022 (19:53 IST)
बहुतेक भागात पूल आणि रस्त्यांच्या उद्घाटनासाठी एखाद्या मोठ्या नेत्याला किंवा सेलिब्रिटीला बोलावले जाते, त्याचप्रमाणे मेक्सिकोमधील एका शहरात बांधलेल्या पुलाच्या उद्घाटनासाठी शहराचे महापौर आणि इतर अधिकाऱ्यांनाआमंत्रित करण्यात आले होते. पुलाच्या उद्घाटनासाठी नगराध्यक्ष व इतर अधिकारी आले होते. या पुलावर चढत असताना तो तुटला आणि महापौरांसह सुमारे 2 डझन लोक नाल्यात पडले.
 
हे प्रकरण मेक्सिकोच्या कुर्निवाका शहरातील आहे.येथे नदीवर फूटब्रिज बांधण्यात आला. हा पूल लाकडी बोर्ड आणि धातूच्या साखळ्यांनी बनलेला होता आणि त्याची पुनर्रचना करण्यात आली होती. प्रत्यक्षात लोक या पुलावर उद्घाटनासाठी चढले असता तो तुटला. यानंतर महापौरांसह सुमारे 2 डझन लोक खाली नाल्यात पडले.

पूल कोसळल्यानंतर परिषद सदस्य आणि शहरातील इतर स्थानिक अधिकारी 3 मीटर खाली नाल्यात पडले. नाल्याखाली दगड होते आणि या दगडांवर लोक पडले. नाल्यात पडलेल्यांमध्ये महापौर, त्यांच्या पत्नी, अनेक अधिकारी आणि पत्रकारांचा समावेश होता. यादरम्यान अनेक जण जखमी झाले, ज्यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
क्षमतेपेक्षा जास्त लोक पुलावर चढल्यामुळे ही घटना घडल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये अनेक लोक नाल्यात पडताना दिसत आहेत. लोक पडल्यानंतर त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जाहीर सभा