Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंडोनेशियात 6.4 तीव्रतेचा भूकंप, 20 लोक मरण पावले, बरेच जखमी

इंडोनेशियात 6.4 तीव्रतेचा भूकंप, 20 लोक मरण पावले, बरेच जखमी
बांदा असेह (इंडोनेशिया) , बुधवार, 7 डिसेंबर 2016 (11:53 IST)
इंडोनेशियाच्या सुमात्रा द्वीपाच्या असेह प्रांतात आज शक्तिशाली भूकंप आल्याने किमान 20 लोकांचा मृत्यू झाला असून बरेच लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झालेले पीडी जयाचे उप जिल्हा प्रमुख सैद मुलयादीने एएफपीला सांगितले, ‘‘दवाखान्यातून मिळालेल्या आकड्यानुसार आतापर्यंत 20 लोकांचा मृत्यू झाला आहे. मरणार्‍यांमध्ये काही लहान मुलं देखील आहे.' यूएस जियोलॉजिकल सर्वे (यूएसजीएस)ने सांगितले की रेउलेउएटच्या उत्तरेत 6.5 तीव्रता असलेला शक्तिशाली भूकंप आला. त्सुनामी संबंधी कुठल्याही चेतावणीचे सांगण्यात आलेले नाही आहे.  
 
स्थानीय अधिकार्‍यांनी सांगितले की भूकंप पहाटे आला आणि त्या वेळेस मुस्लिम बाहुलं या भागात काही लोक नमाज वाचण्याची तयारी करत होते. मुलयादी यांनी सांगितले की मृतकांमध्ये सात मुलं आहे. मोठ्या संख्येत जखमी झालेल्या लोकांना स्थानीय दवाखान्यात पाठवण्यात येत आहे. मशीद, घर आणि दुकानं भूकंपात ढेर झाले आहेत. भूकंपामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या भागांमध्ये बराच नुकसान झालेले दिसत आहे. स्थानीय निवासी हस्बी जया (37) ने सांगितले की जेव्हा भूकंप आला, तेव्हा त्यांचा परिवार झोपला होता.  
 
आम्ही लगेचच घराबाहेर निघालो आणि त्याच क्षणी आमचे घर कोसळले. छतापासून फरशींपर्यंत सर्व काही नष्ट झाले. तो म्हणाला मी चारीकडे बघितले तर आमच्या शेजार्‍यांचे घर पूर्णपणे नष्ट झाले होते. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने सांगितले की ध्वस्त इमारतींच्या खाली अडकलेले लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या गावाची सर्व जमीन देवाच्या नावावर, घरांना दारं नाही