कोस्टा रिका आणि पनामा या मध्य अमेरिकन देशांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.4 मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या मते, कोस्टा रिकाची राजधानी सॅन जोस येथे 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. ज्याचे केंद्र 31 किमी खोलीवर होते. भूकंपामुळे जीवित वा वित्तहानी झाल्याची माहिती सध्या तरी मिळालेली नाही.
पनामाच्या किनारपट्टीवर मंगळवारी 6.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, भूकंपामुळे नुकसानीचे कोणतेही वृत्त नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू चिरीकी प्रांतातील बोका चिकाच्या दक्षिणेस 72 किमी अंतरावर होता, शेजारच्या कोस्टा रिकाची राजधानी सॅन जोस येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय आपत्कालीन आयोगाने सांगितले की कोस्टा रिकामध्येही भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नाही.
पनामाला भूकंपाचा धक्का बसल्यानंतर स्थानिक फुटबॉल सामन्यादरम्यान एक खेळाडू जमिनीवर पडला. त्याचा व्हिडिओ टीव्हीवर प्रसारित झाला आहे. मैदानावरील कंपन आणि स्टेडियमचे दिवे गेल्यामुळे खेळ थांबवावा लागला. USGS नुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली 10 किलोमीटर (6.2 मैल) खोलीवर होता. भूकंपानंतर त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचे यूएस त्सुनामी चेतावणी प्रणालीने म्हटले आहे.