Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Earthquake: नेपाळला पुन्हा भूकंपाचा धक्का, एका दिवसात तिसऱ्यांदा पृथ्वी हादरली

earthquake
, रविवार, 5 नोव्हेंबर 2023 (10:22 IST)
विनाशकारी भूकंपाचा सामना करत असलेल्या नेपाळमध्ये रविवारी सकाळी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी तीव्रता 3.6 इतकी मोजली गेली आहे. नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरने सांगितले की भूकंप रविवारी पहाटे 4:38 वाजता झाला, त्याचा केंद्रबिंदू काठमांडूपासून 169 किमी उत्तर-पश्चिम 10 किमी खोलीवर होता. उल्लेखनीय आहे की नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यानंतर शनिवारी दुपारीही 3.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे नेपाळमधील लोकांना भीतीने जगणे भाग पडले आहे.
 
नेपाळमध्ये शुक्रवारी रात्री 11.47 वाजता झालेल्या भूकंपाचे 159 धक्के जाणवले.आतापर्यंत  157 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 375 जण जखमी झाले आहेत. जाजरकोट आणि पश्चिम रुकुम या पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक विध्वंस झाला आहे. शुक्रवारी रात्री भूकंपाच्या सुरुवातीच्या धक्क्यांनंतर पश्चिम नेपाळमध्ये 159 धक्के जाणवल्याचे वृत्त आहे.
 
पश्चिम नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेच्या भूकंपामुळे हजारो घरे उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो लोक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्याचे काम लष्कराने हाती घेतले आहे. ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्याची धडपड सुरू आहे. गृह मंत्रालयाचे प्रवक्ते नारायण प्रसाद भट्टराई यांनी सांगितले की, जाजरकोट आणि पश्चिम रुकुम या पश्चिम जिल्ह्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. एकट्या जाजरकोटमध्ये 105 तर रुकुममध्ये 52जणांचा मृत्यू झाला. 
 
नेपाळ लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर कृष्ण प्रसाद भंडारी यांनी सांगितले की, लष्कराचे जवान ढिगाऱ्याखालून लोकांना वाचवत सुरक्षित ठिकाणी पोहोचवत आहेत. जाजरकोट आणि पश्चिम रुकुम येथील 33 लोकांना लष्कराच्या हेलिकॉप्टरने नेपाळगंज येथे नेण्यात आले. त्याचवेळी नेपाळ एअरलाइन्सच्या विमानाने सात जणांना काठमांडूला नेण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बंद पडलेले रस्ते आणि खराब झालेले पूल यामुळे घटनास्थळी बचाव आणि मदत कार्यात अडथळे येत आहेत.
 





Edited by - Priya Dixit  
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs SA Playing 11:उपांत्य फेरीत पोहोचलेला भारत इशानला संधी देईल का?प्लेइंग 11 जाणून घ्या