Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंडोनेशियात तीव्र भूकंप, 7 ठार, शेकडो जखमी

इंडोनेशियात तीव्र भूकंप, 7 ठार, शेकडो जखमी
जकार्ता , शुक्रवार, 15 जानेवारी 2021 (10:46 IST)
इंडोनेशियात भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.2 आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपाचे केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर खाली असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीच्या अहवालानुसार सर्वाधिक नुकसान इंडोनेशियाच्या सुलावेसी शहरात झाले आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार मृतांची संख्या वाढू शकते.
 
भूकंपाचे केंद्रबिंदू माजेणे शहराच्या ईशान्य दिशेस 6 किमी अंतरावर नोंदवले जात आहे. रात्री एक वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. प्राथमिक अहवालानुसार आतापर्यंत 60 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. असे म्हटले जात आहे की सुमारे 7 सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, भूकंपानंतर त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. यापूर्वी गुरुवारी देशाच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्या, आजपासून तिसरा टप्पा सुरू होईल