शैक्षणिक शुल्काबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. तक्रार निवारण कक्षामार्फतही पालकांच्या व शिक्षकांच्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शुल्क अधिनियम अन्वये सहसचिवाच्या अध्यक्षतेखाली शुल्क सुधारणा समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीच्या बैठका होत आहे.
या समितीस सूचना प्राप्त झाल्या आहेत. या समितीवर विधी व न्याय विभाग असून नियमात काय बसते यानुसार कायदा तयार करण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र विधान परिषद नियम 93 अन्वये मांडलेल्या निवेदनाच्या उत्तरात सांगितले.विधान परिषद सदस्य नागारोव गाणार यांनी शुल्क सुधारणा समितीबाबत निवेदन सादर केले होते.