rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंड्यात विषारी जंतूनाशक

eggs
जर्मनी, हॉलंड आणि बेल्जियममध्ये कोंबडीचे लाखो अंडी फेकण्यात येत आहे. या अंड्यामध्ये अत्यंत विषारी जंतूनाशक आढळले आहेत. जर्मनी येथील सर्वात मोठी सुपर मार्केट चेन आल्डीने आपल्या शेकडो स्टोअरमधून सर्व अंडी वापस घेण्याची घोषणा केली 
 
आहे. बेल्जियम आणि हॉलंडमध्ये ही हीच स्थिती आहे. तिन्ही देशांच्या अंड्यात फिप्रोनिल नावाचे एक अत्यंत विषारी जंतूनाशक आढळले आहेत.
 
मानवी शरीरात अधिक प्रमाणात फिप्रोनिल प्रवेश केल्यास ते लिव्हर, किडनी आणि थायरॉईड ग्रंथीसाठी धोकादायक सिद्ध होऊ शकतं. ही चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेने दिली असून अश्या प्रकरणात उल्ट्या, चक्कर येणे आणि पोटाच्या खालील बाजूला वेदना अश्या आजारांना सामोरा जावं लागू शकतं.
 
फिप्रोनिल हे जनावरांना जुई, किन्ने आणि माश्यांपासून राहत देण्यासाठी केला जातो. हे रसायन रक्त शोषणारे जंतूंचा खात्मा करतं परंतू हेच रसायन अंड्यात दोन बॅचमध्ये आढळले आहे.
 
सहा वर्षात हा दुसर्‍या युरोपतील पोल्ट्री फॉर्मसमोर असे संकट आले आहे. फिप्रोनिलमुळे हॉलंडमधील 150 हून अधिक पोल्ट्री फॉर्म तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. जर्मनीच्या कृषि मंत्रालयद्वारे हॉलंडमध्ये 30 लाख अंडी जर्मन बाजारात पोहचल्या अंदाज बांधण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Live Updates : मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात