इजिप्शियन पोलिस अधिकाऱ्याच्या गणवेशात आलेल्या बंदुकधारी व्यक्तीने केलेल्या गोळीबारात तीन इस्रायली सैनिक ठार झाले. इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने या घटनेला दुजोरा दिला आहे.
इजिप्तच्या सीमेवर लष्करी चौकीचे रक्षण करणाऱ्या एका पोलिसाने शनिवारी पहाटे गोळीबार केला. ज्यामध्ये दोन जवानांना प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर पुन्हा गोळीबार झाला. ज्यात एक इजिप्शियन पोलीस अधिकारी आणि तिसरा इस्रायली सैनिक मारला गेला. लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, सैन्याने सीमेपलीकडून ड्रग्जची तस्करी करण्याचा प्रयत्न हाणून पाडला तेव्हा चकमक सुरू झाली.
सुरक्षा दलाच्या एका सदस्याने ड्रग्ज तस्करांचा पाठलाग केला. पाठलाग करताना सुरक्षा एजंटने सीमा ओलांडली. त्यानंतर गोळीबार झाला. इजिप्त-गाझा पट्टी सीमेजवळ, इस्रायल आणि इजिप्तमधील नितजाना आणि अल-अवजा सीमेजवळ ही घटना घडली. इजिप्तमधून इस्रायल किंवा गाझा पट्टीमध्ये माल नेण्यासाठी याचा वापर केला जातो. लष्कराने जारी केलेल्या निवेदनानुसार, इजिप्तचे संरक्षण मंत्री मोहम्मद झाकी यांनी सीमेवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर आपल्या इस्रायली समकक्षांशी बोलून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परस्पर समन्वयावर चर्चा केली.
संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल, असा दावा इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी केला. या हत्येचा तस्करीशी संबंध असल्याचेही तपासादरम्यान लक्षात येईल.