Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Elon Musk Affair: एलोन मस्क 9 मुलांचे वडील आहेत, प्रत्येकाची आई वेगळी आहे

Elon Musk Affair: एलोन मस्क 9 मुलांचे वडील आहेत, प्रत्येकाची आई वेगळी आहे
, सोमवार, 25 जुलै 2022 (17:31 IST)
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला (Tesla)चे सीईओ एलोन मस्क (Elon Musk Affairs)अफेअर्स पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. त्यांच्या कामाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्य आणि घडामोडींच्या अनेक कथा आहेत. आता 'वॉल स्ट्रीट जर्नल' या अमेरिकन वृत्तपत्राच्या रिपोर्टमध्ये मस्कचे गुगलच्या सहसंस्थापकाच्या पत्नीसोबत अफेअर असल्याचा दावा करण्यात आला आहे. इलॉन मस्कचे आयुष्य कसे आहे ते जाणून घेऊया..
  
वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात मस्क आणि गुगलचे सहसंस्थापक सेर्गे ब्रिन यांची पत्नी निकोल शानाहन यांच्यात अफेअर असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे ब्रिन आणि शानाहान यांच्यात घटस्फोटही होणार आहे. आतापर्यंत दोन्ही जोडीदारांपैकी दोघांनीही या अहवालावर प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र मस्कने ट्विटरवर हे दावे फेटाळून लावले आहेत.
 
एलोन मस्कचे अनेक महिलांसोबत अफेअर होते. आतापर्यंत मस्कचे सहा अफेअर जगासमोर आले आहेत. त्याने तीनवेळा लग्ने केली होती, त्यापैकी दोनदा त्याने एकाच मुलीशी लग्न केले होते.
 
जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इलॉन मस्कच्या गर्लफ्रेंडच्या यादीत नताशा सर्वात तरुण आहे. मस्कच्या गर्लफ्रेंडच्या यादीत अंबर हर्ड आणि ब्रिटिश अभिनेत्री तल्लुलाह रिले यांचाही समावेश आहे. त्याच वेळी,  एलोन मस्कने गेल्या वर्षीच ग्रिम्सपासून घटस्फोट घेतला होता.
 
रिपोर्टनुसार, मस्क आणि नताशा फेब्रुवारी 2022 पासून एकमेकांना डेट करत आहेत. यापूर्वी दोघेही अमेरिकेत एकत्र दिसले होते. सप्टेंबर 2021 मध्ये मस्क आणि ग्रिम्स वेगळे झाले. यानंतर एक्स-गर्लफ्रेंड ग्रिम्सने डिसेंबरमध्ये सरोगेटद्वारे दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
 
रिपोर्ट्सनुसार, एलोन मस्क आत्तापर्यंत 9 मुलांचा बाप बनला आहे. या सर्व मुलांची आई वेगळी आहे. आतापर्यंत जगाला त्याच्या 9 मुलांबद्दलच माहिती होती.
 
मात्र, काही दिवसांपूर्वी इलॉन मस्कच्या कंपनीत काम करणाऱ्या शिवॉन जिलिस या महिला अधिकाऱ्याने दोन जुळ्या मुलांना जन्म दिल्याचे समोर आले होते. ही मुले मस्कची आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचा जन्म झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चार धाम यात्रा आणि हिमालयाचं संवर्धन एकाच वेळी शक्य आहे का?