Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लठ्ठपणा! 25 वर्षांपासून घरातून बाहेर पडली नाही ती...

लठ्ठपणा! 25 वर्षांपासून घरातून बाहेर पडली नाही ती...
दुनियेतील सर्वात लठ्ठ महिला इमान अहमद अब्दुलाति मागील 25 वर्षांपासून आपल्या घरातून बाहेर पडलेली नाही. ती स्वत:ला स्वच्छही ठेवू शकत नाही आणि स्वत: जेवूही शकत नाही.
 
इजिप्तच्या अलेग्जँड्रिया येथे राहणारी 36 वर्षीय इमान हिचे वजन 500 किलो आहे आणि लठ्ठपणामुळे ती बिछान्यावर बाजूदेखील बदलू शकत नाही. जेवण, कपडे बदलणे, शरीराची स्वच्छता अश्या कामांसाठी तिला आपल्या आई आणि बहिणीची मदत घ्यावी लागते. जन्माच्या वेळी इमानचे वजन पाच किलो होतं, जे सामान्यपेक्षा अधिकच होतं.
चिकित्सकांनी इमानच्या वाढत असलेल्या वजनासाठी तिच्या ग्रंथीमध्ये बिघाड असणे सांगितले. सामान्य लोकांच्या तुलनेत तिच्या शरीरात अधिक पाणी असतं. अकरा वर्षाच्या वयात तिचं वजन आणि लठ्ठपणा एवढा वाढून गेला होता तिला उभे राहणे शक्य नव्हते. ती गुडघ्याच्या मदतीने रेंगाळून आपले काम करायची.
 
अकरा वर्षाच्या वयातच तिला ब्रेन स्ट्रोकला सामोरा जावं लागलं ज्यानंतर ती अपंग झाली आणि तिला शाळा सोडावी लागली. स्ट्रोक आल्यापासून इमान आपल्याला खोलीतून बाहेर पडत नाही. यामुळे तिच्या वजन सतत वाढत आहे.
 
इमानचे वजन आता 500 किलो झाले आहे आणि तिच्या कुटुंबाने तिचा फोटो ऑनलाईन पोस्ट करून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतेह अल-सिसी यांच्याकडून चिकित्सेत मदत करण्याची अपील केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फेस्टिव्हल सिझनमध्ये शॉपिंग करताना..