Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंजशीर मध्ये गोळीबार: मुलांसह अनेकांनी हवाई गोळीबारात आपले प्राण गमावले

पंजशीर मध्ये गोळीबार: मुलांसह अनेकांनी हवाई गोळीबारात आपले प्राण गमावले
, शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (11:26 IST)
अफगाणिस्तानमध्ये पंजशीरवरील रक्तरंजित संघर्ष सुरू आहे. 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानमध्ये सत्तेत परतलेल्या तालिबानने शुक्रवारी दावा केला की त्याने पंजशीरवरही कब्जा केला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार तालिबान्यांनी शुक्रवारी रात्री पंजशीर ताब्यात घेतल्यानंतर हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला. तालिबानचा हा उत्सव सामान्य अफगाणांसाठी एक भयानक स्वप्न बनला आणि काबुलमध्ये तालिबानच्या हवाई गोळीबारात लहान मुलांसह अनेक लोक मारले गेले आणि अनेक जखमी झाले. रेझिस्टन्स फोर्सने तालिबानचा दावा फेटाळून लावला आहे आणि म्हटले आहे की पंजशीर अजूनही तालिबानच्या ताब्यात नाही.
 
त्यांनी पंजशीर प्रांताचा ताबा घेतल्याचा विश्वास ठेवून तालिबानने शुक्रवारी रात्री काबूलच्या बऱ्याच भागात आनंद व्यक्त करत हवेत गोळीबार केल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या हवाई गोळीबारामुळे काबूलमधील अनेक लोकांचा जीव गेला. येथे, काबूलच्या उत्सवाच्या दरम्यान, रेझिस्टन्स फोर्सने तालिबानचा दावा फेटाळून लावला की, पंजशीर अजूनही त्यांच्या ताब्यात आहे आणि त्यांनी युद्धात तालिबानचे मोठे नुकसान केले आहे. तालिबानच्या गोळीबारात जखमी झालेल्या अनेकांना शुक्रवारी रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
तालिबान्यांनी पंजशीरवर ताबा मिळवल्यानंतर, स्वतःला अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष घोषित करणारे अमरुल्ला सालेह पण पंजशीरमधून पळून गेल्याचे वृत्त आहे.मात्र, या दरम्यान,अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती आणि तालिबानला पंजशीरमधून आव्हान देणारे अमरुल्ला सालेह स्वतः एका व्हिडिओद्वारे समोर आले आणि त्यांनी देश सोडून पलायन केले नसल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले आहे की ते पंजशीर खोऱ्यात आहेत आणि रेझिस्टन्स दलाचे कमांडर आणि राजकीय व्यक्तींसोबत आहेत. 
 
अमरुल्ला सालेहने तालिबानच्या कब्जाचा दावा जोरदारपणे फेटाळला आहे आणि म्हटले आहे की गेल्या चार ते पाच दिवसांपासून पंजशीर खोऱ्यावर तालिबान आणि इतर सैन्याद्वारे हल्ला केला जात आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय सांगता,मुलीच्या पोटातून 2 किलो केस निघाले