Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्राझील मध्ये मुसळधार पाऊसामुळे आला पूर, 29 लोकांचा मृत्यू

Heavy Rainfall
, शुक्रवार, 3 मे 2024 (13:02 IST)
पृथ्वीवर सध्या वातावरण बदलत आहे. केव्हा वातावरण बदलेले सांगता येत नाही. आजकाल वातावरण सतत बदलत आहे. असेच काहीसे बदललेले वातावरण आता ब्राझील देशात पाहावयास मिळत आहे. ब्राझील मध्ये अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे तिथे पूर आला आहे. तसेच दलदल धसण्याची समस्या देखील पाहवयास मिळाली. दक्षिण ब्राझील मध्ये रियो ग्रांडे डो सुल राज्यामध्ये पावसामुळे वाईट अवस्था झाली आहे. येथील लोकांमध्ये हाहाकार निर्माण झाला आहे. आता पर्यंत 29 लोकांचा मृत्यू झाला असून रियो ग्रांडे डो सुलमध्ये मुसळधार पावसामुळे आलेला पूर आणि चिखल ढासळल्याने आतापर्यंत 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 
 
36 लोक जखमी झाले आसून, 10 हजार पेक्षा जास्त लोकांचे नुकसान झाले आहे. रियो ग्रांडे डो सुलमध्ये मुसळधार पावसाने आलेला पूर आणि चिखल ढासळल्यामुळे आतापर्यंत 36 लोक जखमी झाले आहे. सोबतच 10 हजार पेक्षा जास्त लोक बेघर झाले आहे. लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे, रस्ते जलमग्न झाले आहे. रियो ग्रांडे डो सुलमध्ये अनेक भागांमध्ये लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे.या कारणामुळे ट्रॅफिक देखील प्रभावित होत आहे. 

Edited By- Dhanashri Naik   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Covaxin पूर्णपणे सुरक्षित, भारत बायोटेकचा दावा