अफगाणिस्तानमध्ये आलेल्या पुरात 300 हून अधिक अफगाण लोकांचा मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अन्न संस्थेने म्हटले आहे. पुरामुळे अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील बागलान प्रांतात 1,000 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली,अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही आठवड्यांत झालेल्या विलक्षण मुसळधार पावसानंतर हा पूर आला आहे.बचाव पथके पूरग्रस्त भागात पोहोचली आहेत.
आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्सनुसार 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, अचानक आलेल्या पुरात 300 हून अधिक अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पुरामुळे शेकडो लोक जखमीही झाले आहेत. तालिबानच्या एका अधिकाऱ्याने नेमकी आकडेवारी न देता शनिवारी ही माहिती दिली.जखमींना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सद्यस्थितीत पुरामुळे मृतांची संख्या जाहीर करण्यात आलेली नाही. इस्लामिक अमिरातीचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी पूरग्रस्तांसाठी शोक व्यक्त केला.
देशाच्या उत्तरेकडील भागाला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.तालिबान सरकारचे मुख्य प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिले, "या विनाशकारी पुरात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत."
पूरग्रस्तांना बिस्किटांचे वाटप करत आहेत. अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही आठवड्यांत झालेल्या विलक्षण मुसळधार पावसानंतर हा पूर आला आहे. संरक्षण आणि गृह मंत्रालयांना लोकांना वाचवण्यासाठी सर्व उपलब्ध संसाधने वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.