Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना विरूद्ध लढ्यात फ्रान्सची भारताला मोठी मदत

कोरोना विरूद्ध लढ्यात फ्रान्सची भारताला मोठी मदत
, मंगळवार, 28 जुलै 2020 (09:16 IST)
फ्रान्सने कोरोना विरूद्ध लढण्यासाठी भारताला मदत जाहीर केली आहे. फ्रान्सने कोरोनाशी सामना करण्यासाठी व्हेंटिलेटर आणि किट पाठवल्या आहेत जे मंगळवारपर्यंत भारतात पोहोचतील. भारतातीव फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली.
 
खरं तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकतीच कोरोनाशी सामना करण्यासाठी भारताला वैद्यकीय उपकरणांचे अनुदान देण्याची घोषणा केली. धोरणात्मक भागीदार म्हणून फ्रान्स आणि भारत कोरोना विषाणूविरूद्ध एकत्र काम करत आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी 24 जुलै रोजी लिहिलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या सुरुवातीस मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
 
अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी लिहिले की, 'फ्रान्स सार्वजनिक आरोग्याच्या कठीण काळातून जात असताना भारताने मदत केली. औषधांच्या बाबतीत त्यांनी (भारत) फार महत्वाची भूमिका बजावली. गंभीर आजारी रूग्णांच्या उपचारांसाठी आवश्यक असलेल्या औषधांच्या निर्यातीला अधिकृत केल्याबद्दल मी पुन्हा एकदा आभारी आहे. ही आपल्या दरम्यान धोरणात्मक भागीदारी दर्शवते.'
 
फ्रान्सचे अध्यक्ष म्हणाले की, या संकटात फ्रान्स तुमच्या पाठीशी आहे. आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत. भारतीय प्रशासनाने जी (वैद्यकीय संबंधित) मदत मागितली ती आम्ही द्यायला सांगितली आहे.
 
फ्रान्सने 50 ओसीरिस -3 व्हेंटिलेटर, 70 युवेल 830 व्हेंटिलेटर आणि किट्स भारतात पाठवल्या आहेत. फ्रान्स एअरफोर्स ए 330 एमआरटीटी विमान ही वैद्यकीय मदत घेऊन येत आहे. ओसीरिस व्हेंटिलेटर विशेषत: आणीबाणीच्या वाहतुकीदरम्यान वापरला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्राकडून जीएसटी परतावा जाहीर, मिळाले १९ हजार कोटी